बँकेविषयी माहिती

अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., अहमदनगर या नांवाने बँक स्थापन 30/10/1972 रोजी बँकेची स्थापना झाली.

     सुरुवातीपासूनच अहमदनगर शहराचा विकास होण्यासाठी शहर व शहराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग धंदे स्थापन होवून ते उर्जितावस्थेत येण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने औद्योगिक क्षेत्रास जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला व बँकेने जवळपास रक्कम रुपये 300 कोटीचा कर्जपुरवठा औद्योगिक क्षेत्रास केलेला आहे. दिनांक 26/03/1973 पासून बँकेच्या बँकींग व्यवहार करण्यास सुरुवात झाली सुरुवातीस बँकेच्या ठेवी रक्कम रुपये 13.92 लाख च्या होत्या तर कर्जे रक्कम रुपये 8.31 लाखाची होती. बँकेची सभासद संख्या 514 एवढी होती तर वसुल भाग भांडवल रक्कम रुपये 1,28,500/- होते. सुरुवातीलाच बँकेस रक्कम 0.02 लाखाचा निव्वळ  नफा झालेला होता.

     बँकेच्या खातेदारांना अत्यंत जलद व बिनचूक बँकींग सेवा सुविधा  अत्यंत अत्यल्प दरात पुरविण्याचा बँकेचा प्रयत्न राहिलेला आहे व आजही बँक अत्यंत अल्प दरात खातेदारांना बँकींग सेवा सुविधा देत आहोत व त्याकरीता मा. संचालक मंडळाने सन 1989 पासूनच व्यवहाराचे संगणकीकरण करणे गरजेचे आहे ही बाब विचारात घेवून तेव्हापासूनच बँकेच्या संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण करण्यास सुरुवात केली व आज मर्चन्टस् बँक ही अखिल महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकात संपूर्ण कॉम्प्युटराईज्ड झालेली अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते.

         कोअर बँकींग प्रणालीचा अवलंब केल्यामुळे आज बँक ज्या जलद व बिनचूक बँकींग सेवा सुविधा ग्राहकांना देत आहे त्या तर जलद व बिनचूक दिल्या जातात. बँकेच्या ग्राहकांचे युनिक आयडेन्टीफिकेशन केलेले असल्याने तो बँकेच्या कोणत्याही शाखेचा खातेदार न होता तो संपूर्ण मर्चन्ट बँकेचा खातेदार झालेला आहे. बँकेच्या नियमित कर्ज खातेदारांना व्याजदरात द.सा.द.शे. 2.50 ते 4 टक्के पर्यन्त रिबेट दिला जात असून कर्जा वरील व्याजदर नियमित कर्जदारांसाठी द.सा.द.शे.11 .00 टक्के एवढाच ठेवलेला आहे.रिझर्व बँक ऑफ इंडियाने नागरी सहकारी बँकांकरीता वेळोवेळी काढलेले आदेश व परिपत्रकांची अंमलबजावणी बँकेने त्वरीत करून त्यासाठी पुरेसे निधी उभारलेले आहेत व याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बँकेचे नक्त एन.पी.ए. शून्य टक्के एवढे आहेत.

   बँकेचे अहमदनगर शहरात स्वमालकीचे ३ ए.टी.एम. मार्केट यार्ड, गुलमोहर रोड व चितळे रोड येथे असून एच.डी.एफ.सी. बॅंकेच्या सह्कार्याने बँकेच्या खातेदारांना संपूर्ण भारतभर ए.टी.एम. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बँकेने रूपे ए.टी.एम. कार्ड द्वारे कार्डधारकांना प्रत्येक दिवशी रक्कम रुपये ७५,००० /- रोखीने काढण्याची व रक्कम रुपये २५,०००/- ची खरेदी करण्याची अशी एकूण रक्कम रुपये १,००,०००/- पर्यन्तची सुविधा उपलब्ध करून दिलेली असून रूपे डेबिट कार्डद्वारे युटीलिटी पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

     बँकेने खातेदारांसाठी मोबाईल पासबुक (ई –पासबुक) अॅपची सुविधा उपलब्ध करून दिलेली असून सदरच्या अँपद्वारे खातेदारांना त्यांच्या खात्यावरील मागील ३ महिन्यात झालेल्या व्यवहाराची माहिती उपलब्ध होत आहे.मर्चन्ट बँक अँप द्वारे खातेदारांना त्यांच्या खात्यावरील मागील चार व्यवहार पाहण्याची तसेच एस॰एम.एस. द्वारे खात्याच्या बँलन्स मागविण्याची,खात्याच्या चेकची माहिती मागविण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .

     ठेवीदार व कर्जदारांना त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचा एस.एम.एस. पाठविला जातो. बॅंकेतर्फे देण्यात येणाऱ्या जलद व बिनचूक बॅंकिंग सेवा सुविधाचा एक भाग म्हणून सर्व शाखांमधील नजरगहाण /एस.एस.आय. नजरगहाण कर्ज खातेदारांकडून त्यांचे स्टॉक स्टेटमेंट ई-मेलवर मागविण्याबाबतची कार्यवाही काण्यात आली आहे.

     ऑटोमेशन व पेपरलेस बँकींगचा एक भाग म्हणून बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेच्या कामकाजाच्या सुकरतेच्या दृष्टीने बँकेच्या नावा सहित ईमेल आयडी देण्यात आलेले आहेत. खातेदारांच्या सोयीसाठी कॅश डिपॉझिट मशिन्स, चेक डिपॉझीट मशिन्स ऑनलाईन पासबुक प्रिंटर्स बसविण्यात आलेले आहेत.

     खातेदाराने केलेल्या एन .ई .एफ़ टी अथवा आर.टी.जी.एस. चा यु .टी. आर. नंबर त्वरीत खातेदाराच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

     बँकेच्या खातेदारांचे व्यवहार सुरक्षित राहण्यासाठी बॅंकेने आधार कार्डवर आधारीत अशी ई -के.वाय.सी.ची प्रणाली अंमलात देणार असून त्याद्वारे बँक  खातेदारांचे थम इम्प्रेशन व फोटो स्कॅनिंग करण्याची व्यवस्था सर्व शाखांमध्ये लवकरच सुरू करण्यात येत आहे .

     आय.एम.पी.एस (इमिजिएट पेमेंट सिस्टीम ) द्वारे  बँकेच्या खातेदारांना फंड्स ट्रान्स्फरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

     सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेच्या ए.टी.एम. धारकांना अद्ययावत असे ई.व्ही.चिप काई देण्यात येत आहेत. खातेदाराना त्यांचे टेलीफोन बिल, लाईटबिल यासारखे युटिलिटी पेमेंट ऑनलाईन करण्याची सुविधा रुपे डेबीट कार्डद्धारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

     रिझर्व बँक ऑफ इंडियाने सुचविल्याप्रमाणे यु.पी.आय. (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) सिस्टीम खातेदारांसाठी लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

     काळाची गरज ओळखून कर्जदारांच्या सोयीसाठी डॉक्युमेंट मेनेजमेंट सिस्टीम अंतर्गत लवकरच फक्त चालू वर्षाची आर्थिक पत्रके व कागदपत्रे बँकेकडे सादर करून त्यांच्या कर्जे खात्याचे नुतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

सभासद :-

               बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सन 1997 मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात बँकेच्या सभासदांना प्रत्येकी रक्कम रुपये 2,500/- ची ठेव पावती देण्यात आली तर बँकेने 40व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल दिनांक 31/03/2011 रोजी असलेल्या बँकेच्या 6034 सभासदांना प्रत्येकी रक्कम रुपये 4,100/- ची मुदत ठेव पावती भेट देण्यात आलेली आहे.  बँकेच्या प्रत्येक सभासदाचा रक्कम रुपये 1 लाखाचा अपघाती विमा तसेच सभासदाचे अकाली निधन झाल्यास त्याच्या अवलंबीत पती/पत्नीस 60 महिन्यांकरीता दरमहा रक्कम रुपये 1,000/- चे विना परतीचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच प्रमाणे हृदयविकार, ब्रेन हॅम्रेज, कॅन्सर, किडनी प्लांटेशन इत्यादी साठी रक्कम रुपये 35,000/- चे विना परतीचे अर्थसहाय्य दिल जाते. त्याच प्रमाणे सभासदाचा पाल्य उच्च परदेशस्थ शिक्षणासाठी गेल्यास अथवा कला, क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखविल्यास त्यास रक्कम रुपये 25,000/- चे विना परतीचे अर्थसहाय्य दिले जाते. सामाजिक बांधिलकीनुसार बँकेच्या सभासदाने 2 अपत्यांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्यास रक्कम रुपये 1,000/- चे प्रोत्साहनवर पारितोषिक देण्यात येते.

सेवक वर्ग :-

          बँकेचा सेवकवर्ग ही बँकेची मालमत्ता आहे व त्यांच्या परीश्रमावरच बँकेची प्रगती अवलंबून आहे याचा सर्वांगिण विचार करून बँक बँकेच्या सेवकांना इतर कुठल्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा सर्वात जास्त वेतन देते व या साठी सेवकांच्या प्रातिनिधीक युनियनबरोबर दर पाच वर्षातून एकदा पगारवाढीबाबत करार केला जातो.         

        बँकेचा प्रत्येक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची रक्कम रुपये 2,00,000/- ची फ्लोटर मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलीसी दरवर्षी उतरविली जाते. नैसर्गिक अगर अकल्पित आपत्तीमुळे बँकेच्या कर्मचा-याच्या पुनर्वसना साठी रक्कम रुपये 15,000/- पर्यन्तचे विना परतीचे अर्थसहाय्य केले जाते. बँकेच्या सेवकाचे अपघाती अगर अकाली निधन झाल्यास त्याच्या पत्नीस अलवंबितास 60 महिन्यापर्यन्त दरमहा रक्कम रुपये 2,000/- चे अर्थसहाय्य केले जाते. खेळ, कला, क्रिडा, उच्चपरदेशस्थ शिक्षणासाठी बँकेच्या सेवकास अगर त्याच्या मुलास/मुलीस रक्कम रुपये 25,000/- पर्यन्तचे अनुदान दिले जाते तसेच बँकेच्या सर्व सेवकांचा प्रत्येकी रक्कम रुपये 5,00,000/- चा अपघात विमा दरवर्षी उरतविला जातो.

              बँकेचे संस्थापक व विद्यमान संचालक श्री. हस्तीमलजी मुनोत यांच्या कुशल नेतृत्वाखाली, विद्यमान चेअरमन श्री. संजीव गांधी व व्हाईस चेअरमन श्री. विजय कोथिंबीरे तसेच संचालक मंडळाचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्ना मुळे बँक भरघोस प्रगती करीत असून सध्याच्या खुल्या अर्थव्यवस्थेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान बँकेमध्ये आणण्याबाबत ते प्रयत्नशील आहेत.

 

बँकेस मिळालेली पारितोषिके

1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्यातर्फे पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा बेस्ट बँक (अर्बन बँक), नाशिक विभागासाठी मिळालेले वर्ष 1995-96 तसेच 1997-98 चे अवॉर्ड.

2. विटा मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., यांच्यातर्फे वर्ष 1998-99 मध्ये बेस्ट बँक म्हणून गौरव.

3. अवि प्रकाशन, कोल्हापूर यांच्या वतीन देण्यात येणारा रक्कम रुपये 501 ते 1000 कोटीच्या ठेवी असलेल्या बँकांसाठी देण्यात येणारा बेस्ट बँक 2012-13 यावर्षीचा पुरस्कार.

4. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्यातर्फे पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा बेस्ट बँक (अर्बन बँक), नाशिक विभागासाठी मिळालेले वर्ष 2013-14, 2014-15 तसेच 2015-16 चे सलग तीन वर्षासाठी अवॉर्ड.

5. बँकिंग फ़्रन्तिअर मासिक तर्फे उत्कृष्ट प्रॉपर्टी लोन अचीवमेंट पुरस्कार.

6. बँकिंग फ़्रन्तिअर मासिक तर्फे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार.

7.  अविज प्रकाशन, कोल्हापूर व ग्यालेक्सी इन्मा पुणे यांच्या संयकुत विद्यमाने देण्यात येणारा रक्कम रुपये ते 1000 कोटीच्या ठेवी असलेल्या बँकांसाठी देण्यात येणारा बेस्ट बँक 2015-16 यावर्षीचा पुरस्कार.

 

सामाजिक बांधिलकी

    दरवर्षी 28 मार्च रोजी प.पु.आनंदऋषीजी महाराजसाब यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. दरवर्षी जवळपास 1700 ते 2000 पिशव्यांचे संकलन केले जाते.

     सन 1992-93 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची तीव्रता लक्षात घेवून जिल्ह्यातील खेडोपाडी राहणा¬या लोकांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचे आवाहनानुसार बँकेने तात्काळ रक्कम रुपये 70,000/- खर्च करून पाण्याच्या लोखंडी टाक्या दिल्या.

     मागील वर्षी महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या दुष्काळग्रस्तांसाठी समाजिक बांधिलकीच्या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस  दोन वेळेस रु. 11.00 लाख व रू.10.00 लाखांची मदत. वेळोवेळी महाराष्ट्रात तसेच देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस उदा. किल्लारी भुकंपाच्या वेळेस रक्कम रुपये 1,08,100/- ते त्याच प्रमाणे कारगिल युध्दाच्या वेळी देशाच्या सीमेचे संरक्षण करतांना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी रक्कम रुपये 5 लाखाची देणगी दिली, सुनामी, ओरीसा वादळग्रस्त इत्यादी वेळेस भरघोस अर्थसहाय्य.

      बँकेच्या चॅरीटी फंडातून विविध संस्थांना अर्थसहाय्य केले जाते. अहमदनगर येथील पांजरापोळ गोरक्षण संस्था, स्नेहालय, महावीर विद्या प्रसारक मंडळ तसेच इतर अनेक धर्मादाय संस्थांना वेळोवेळी भरघोस अर्थसहाय्य केले जाते.

       अहमदनगर शहरात विविध सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे गोरगरीबांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. अशा अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी बँकेतर्फे बॅनररूपी जाहिरातीद्वारे भरघोस अर्थसहाय्य केले जाते.

        अहमदनगर येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, दर वर्षी गुढी पाडव्यानिमित्त रसिक ग्रुप या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम, गणेशोत्सव इत्यादी सामाजिक कार्यक्रम/सण यासाठी भरघोस अर्थसहाय्य. तसेच अहमदनगर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी, जाणता राजा या महानाट्याच्या अहमदनगर येथील प्रयोगासाठी तसेच श्रीश्री रविशंकर यांचे योगशिबीरासाठी भरघोस अर्थसहाय्य.

        अहमदनगर शहरात विविध सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. अशा अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी बँकेतर्फे बॅनररूपी जाहिरातीद्वारे भरघोस अर्थसहाय्य केले जाते. तसेच अहमदनगर येथे वेळोवेळी झालेल्या शब्दगंध साहित्य संमेलन, नॅशनल एरोबिक्स चॅम्पियनशिप, रंगकर्मी महोत्सव, पेन्शनर्स असोसिएशन अधिवेशन, दिक्षा महोत्सव, संतदर्शन प्रवचन, युवा परीषद, श्रीमद् भागवत कथा ज्ञानवंद्य, क्रिकेट टुर्नामेंटस्, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याच प्रमाणे दरवर्षी आयोजित करण्यात येणा¬या महावीर व्याख्यानमाला यांना बँकेतर्फे अर्थसहाय्य दिले जाते तसेच दिपावली पाडव्यानिमित्त दरवर्षी बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार यांच्यासाठी स्नेहमिलापाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.